निसर्ग चक्रीवादळ उद्या मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण बुधवारी वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या मुंबईवर आता चक्रीवादळाचे नवे संकट आले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादळाचं चक्रीवादळात रुपांतर झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. चक्रीवादळाचं निसर्ग हे नाव बांगलादेशने प्रस्तावित केले असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे. या वादळाचे ‘निसर्ग चक्रीवादळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दलाची जहाजे, विमाने आणि किनाऱ्यावरची ठाणी, व्यापारी जहाजे आणि मच्छिमारांना, प्रतिकूल हवामानाबाबत सातत्याने इशारा जारी करत आहेत. जिल्हा प्रशासन गावांची पाहणी करत असून कच्या घरात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणार आहे. मुंबईत पालिका प्रशासनाने, मुसळधार पावसाने पाणी भरल्यास त्यासंदर्भात आराखडा आखला आहे. बृहन्मुंबई महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अति दक्ष ठेवला आहे.मुंबईतल्या सर्व २४ प्र्भागातल्या अधिकाऱ्या नी, सखल भाग आणि संभाव्य धोकादायक भाग निश्चित करून तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बीएमसी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील राज्य सरकारी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी केली आहे.

Protected Content