निवडणुकांसाठी कामाला लागा : समाधान महाजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी यावल येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी यावल पंचायत समितीच्या आवारात त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी सुधीर गडकरी ( चोपडा विधानसभा संपर्क प्रमुख ) , विलास पाटील ( जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख ) , संतोष माळी ( वरणगाव) यांच्यासह त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी वार्तालाप केला.

आगामी काळात अनेक निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात नगर परिषद व जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी शिवसेनेचे यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , तालुका उपप्रमुख शरद कोळी , यावल शहर उपप्रमुख संतोष धोबी , योगेश चौधरी , सारंगधर बेहडे , मयुर धोबी, भरत राजपुत , शकील पटेल यांच्यासह अन्य कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.

Protected Content