मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असल्याच्या मुद्यावरून निलेश राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या ३१ बंगल्यांसाठी एकूण १५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यापैकी छगन भुजबळ आणि काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च होणार आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी देखील ९२ लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर, निलेश राणे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे. आग लागी बस्ती में, सरकार अपनी मस्ती मे, असे ट्विट करून निलेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. राज्याची आर्थिक स्थिती खराब असल्याचे सरकारकडूनच अनेकदा सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सजावटीसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.