जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – देशात वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु राज्य आणि केंद्र सरकार यांच्या नियोजनाच्या अभावामुळे सर्वत्र वीजटंचाईसह भारनियमनाचे संकट उभे राहिले आहे.
राज्यातील कोराडी, खापरखेर्डा, पारस, भुसावळ-दीपनगर, नाशिक एकलहरे, परळी आणि चंद्रपूर अशा कोळशाच्या माध्यमातून औष्णिक वीज निर्मिती केंद्रे आहेत. त्यातून ९५४० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. परंतु कोळशाचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात कमी होत असल्याने वीज निर्मिती होऊ शकत नाही. देशात ऐन उन्हाळ्यात वीज टंचाईमुळे परराज्यातून वीज खरेदी किंवा परदेशातून कोळसा आयात करणे हि उपाययोजना नसून मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध असला तरी, उत्पादनाचे लक्ष, वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या मालगाड्या विशेष व्यवस्था करणे हा उपाय असल्याचे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नियोजनाअभावी विजटंचाईसह भारनियमनाचे संकट
3 years ago
No Comments