नियम पाळू पण व्यवसाय करू द्या ; व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

जळगाव : प्रतिनिधी ।  आम्ही सरकारचे कोरोनासाठीचे सगळे नियम पालन करू पण आम्हाला दुकाने उघडून व्यवसाय करू द्या अशा आशयाच्या मागणीचे निवेदन आज शहरातील व्यापाऱ्यांनी  जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले

 

गेल्या वर्षात कोविडचा प्रादुर्भाव पाहता शासनाकडून  6 महिने लॉकडाउन लावण्यात आला होता. त्यामुळे आमचा व्यापाराचे पूर्ण वर्ष त्यात  वाया गेले.  व्यापाऱ्यांनी शासनास पूर्ण सहकार्य केले आहे. बंद काळात आमची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. आता पून्हा लॉकडाउनला सामोरे जाण्याची आमची स्थिती नाही आमचे आर्थिक स्त्रोत पूर्णपणे बंद आहेत  बँकेचे हफ्ते , कामगारांचे पगार , मनपाचे विविध कर ,  घरखर्च , मुलांचे शिक्षण असा खर्च दुकान बंद अथवा सुरू असो आम्हास लागू आहेतच.” ब्रेक द चेन “अंतर्गत आमची दुकाने जास्त दिवस बंद राहिली तर .कोविडपेक्षा ही भयंकर  परिस्थिती निर्माण होईल.  निदान आठवड्याचे पाच दिवस तरी दुकान सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पूर्ण पणे पालन  सर्व व्यापारी करतील  असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे

 

 

महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या कड़क  निर्बंधांचा निषेध करण्यासाठी   8. एप्रिलरोजी खासदार  उन्मेशदादा पाटिल, आमदार  राजूमामा भोळे  यांच्या उपस्थितित    जिल्हाधिकारी   व मनपा आयुक्त   यांची  विविध सुंकुलाचे पदाधिकारी व प्रतिनिधिनि भेट घेतली   व  मागणीचे  निवेदन दिले, यावर  जिल्हाधिकारी  यांनी  सकारात्मक भूमिका घेत शासन आदेश आल्यावर एक दोन दिवसात योग्य निर्णय घेऊ, असे सांगितले,

 

 

या  वेळी  सेंट्रल फुले मार्केट व्यापारी संघटनेतर्फे अध्यक्ष  रमेश मताणी , व  भूषण शिंपी केलकर मार्केटचे  नरेन्द्र कावना, शंकर तलरेजा होलसेल रेडीमेड  संघाचे   सोमन ङाहरा,  अमर दारा,  नामदेव मंधान,  मोहन मतानी,  संजय विसरानी  व जिल्ह्यातील पदाधिकारी  उपस्थित होते

Protected Content