Home Cities यावल निमगाव येथे गोर्वधन गोशाळेचा वर्धापन दिन साजरा

निमगाव येथे गोर्वधन गोशाळेचा वर्धापन दिन साजरा


yawal gomata

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील निमगाव येथील गोर्वधन गोशाळेचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी अनेक भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

गोर्वधन गोशाळेत सकाळी तालुक्यातील आमोदा येथील कन्हैया महाराज यांच्या हस्ते गोमातेची पुजा करुन तिला घास भरवण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष गोपाळ कोळी व उपाध्यक्ष अरुण तावडे यांनी संस्थेव्दारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती कार्यक्रमानिमित उपास्थित भाविकांना दिली.
यावेळी रेवांनद गोशाळेचे अध्यक्ष गोकुळ कोळी, भारती कोळी, साहेबराव कोळी, मनवेल येथील पत्रकार गोकुळ तायडे, विजया तावडे, बाळु तावडे, बळीराम तावडे, लीलाबाई तावडे, भाऊलाल तावडे आदी उपस्थित होते. रात्री वटेश्वर आश्रम वडगाव येथील गोशाळेचे अध्यक्ष ह.भ.प.रविदास महाराज वरसाडेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमगाव, टेंभी व परिसरातील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.


Protected Content

Play sound