जळगाव प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील घनश्याम नगरातून मध्यरात्री घरासेामर लावलेली ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, नेवरलाल दशरथ जगनित (वय-४५) रा. निमखेडी शिवार ता. जि.जळगाव हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. मिळेल ते काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्याच परिसरात त्याचे सारे हे देखील राहतात. कामासाठी लागणारी (एमएच ३५ यू ३४६८) क्रमांकाची दुचाकी आहे. नेवरलाल जगनित यांनी शनिवारी ४ डिसेंबर रोजी सासऱ्यांकडे दुचाकी पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगच्या ठिकाणाहून दुचाकी लांबविल्याची घटना रविवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आली. परिसरात शोधाशोध केली परंतू आढळून आली नाही. याप्रकरणी नेवरलाल जगनित यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.