Home महिला नितू बाळा, तुझा होमवर्क कच्चा आहे ! : सुषमा अंधारेंची टीका

नितू बाळा, तुझा होमवर्क कच्चा आहे ! : सुषमा अंधारेंची टीका

0
32

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्यावर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अतिशय घणाघाती टीका केली आहे.

नितेश राणे आणि सुषमा अंधारे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली असून त्यातून त्यांनी नितेश राणे यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

सुषमा अंधारे यांनी यात म्हटले आहे की,

प्रिय नीतू बाळा,

तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्कची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरापट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास. पण पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल २०१५ सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस? किंवा गानसम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही.

मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणार्‍या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे. भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या बाबांचे वस्त्रहरण करणार्‍या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच.

तुझी आत्या

 

 


Protected Content

Play sound