नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र वानखेडे

 

नाशिक (प्रतिनिधी) नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र किसन वानखेडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या संचालक मंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत 10 सदस्य वैयक्तिक अंतर ठेऊन प्रत्यक्ष तर दहाहून अधिक सदस्य ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

 

सिव्हील इंजिनियर असलेले राजेंद्र वानखेडे यांनी १९८३ पासून ते १९९९ पर्यंत शासकीय सेवेत पाटबंधारे विभागात अभियंता या पदावर काम केले असून त्यानंतर शासकीय सेवेचा राजीनामा देऊन बांधकाम व्यावसायीक म्हणून सुरूवात केली. सामाजिक क्षेत्रात त्यांचा सहभागही मोठा आहे. प्रवीण खाबिया एनसीएफचे अध्यक्ष असताना वानखेडे यांनी उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे.

 

राजेंद्र वानखेडे यांनी पंढरपूर वारीत सात वेळा प्रत्यक्ष व नियोजनात सहभागी झाले असून दरवर्षी 2 ऑक्टोबरला होणाऱ्या नाशिक ते मुंबई एकता रॅलीची धुरा गेल्या चार वर्षांपासून वानखेडे यांच्याकडे आहे. ‘लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटचे’ अध्यक्ष असताना त्यांनी एनसीएफसोबत अनेक उपक्रमात सहकार्य केले आहे.

 

इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सायकलिंग बेस्ट पर्याय 

 

न्यु ग्रेस अकॅडमी’ शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत असताना शाळेत सायकल अकॅडमीची स्थापन करून विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन सायकलिंगकडे खेळ म्हणून बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्विमींग आणि चित्रकला यांची आवड असलेल्या राजेंद्र वानखेडे रोज किमान 25 किमी सायकल चालवतात. सध्या कोरोनाच्या काळात शरीराला व्यायामासाठी इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सायकलिंग हा बेस्ट पर्याय असल्याचे ते सांगतात.

 

Protected Content