चाळीसगाव: प्रतिनिधी । शहरात मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा भरवला जात असल्याची माहिती नाशिकच्या पथकांला लागताच शहर पोलिसांच्या मदतीने दुध डेअरी भागात जुगार अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला. चौदा जणांवर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
शहरातील दुध डेअरी भागात जुगार सुरू असल्याची माहिती नाशिक येथील पथकांना लागली. शहर पोलिस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार काही पोलिसांसोबत दुध डेअरी भागात जुगाराच्या अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला यावेळी ५२ पत्यांचा ताश खेळताना कॉइन व पैसा लावून जुगार खेळला जात होता. पोलिसांनी चौदा जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली. हि कारवाई २६ मार्च रोजी रात्री करण्यात आली. याबाबत पोना ईश्वर पाटील यांनी पोलिस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
अंगझडती दरम्यान निलेश परदेशी यांच्याकडे ८०० रु. रोख , विजयसिंह राजपूत यांच्याकडे मोबाईलसह ३४५० रू.(मोबाईल कि. २५००), वासुदेव पाटील यांच्याकडे ३९०० रू (मोबाईल कि.३००० रू ) व किशोर आवारे यांच्याकडे २७५० आढळून आले. निलेश परदेशी (रा. मालेगाव) , विजयसिंह राजपूत (रा. खरजई ), गणेश चिमटे (रा. शिंगटेनगर ), वासुदेव पाटील (रा. कळमडू ), किशोर आवारे रा. गोकूळधाम), गिरधारी पंडित (झारखंड, सद्गुरू वसावी रा. नांदगाव), राहूल राठोड (रा. चाळीसगाव), अजयकुमार चव्हाण (रा. बिहार), संतोष पंडीत (जि. निरोडी), बापू ठाकरे (रा. बेलगंगा कारखाना) , बबलू पंडित (रा. चाळीसगाव), गणेश गवळी ( रा. हिरापूर रोड), मनोज देवरे ( रा. करमुड ) आदींवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत नाशिक येथील सपोनि सचिन जाधव, पो.उप.नि. निरी पाटील, प्रमोद मंडलीक, सुरेश टांगोरे, नारायण लोहरे, नितीन सपकाळे व चाळीसगाव शहर पोलिस सपोनि सैय्यद, पो. हवा. गणेश पाटील, विजय पाटील व विनोद खैरनार सहभागी झाले होते