नालीचा झाला नाला : सिव्हील लाईनमध्ये नवीन मोठी नाली बांधकामाची मागणी

खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सिव्हील लाईन, भिसे प्लॉट प्रभाग क्र 4 मध्ये नालीचे रूपांतर नाल्यात झाल्याने पावसाचे पाणी परिसरात तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरीता नवीन मोठया नालीचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे.

 

याबाबत असे की, सिव्हील लाईन ,भिसे प्लॉट भागात गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून बांधण्यात आलेली ही मोठी नाली जीर्ण झाली आहे. या नालीमध्ये रेल्वे पटरी मागील टेकडी परिसरातील तसेच परिसरातील छोट्या नालींचे घाण पाणी वाहत असते. त्यामुळे मोठया प्रमाणात या नालीतून घाण पाणी वाहत असते. यापूर्वी सुद्धा पावसाळ्यात नालीत पाणी अडल्याने काही नाल्यांमध्ये रिव्हर्स वॉटर जमा होऊन परिसरात पाणी तुंबले होते. महेश किराणा ते स्व.नरेश पाटील यांचे घराचे मागील भागापर्यंत ही मोठी नाली आहे. सदर नाली ही गेल्या काही वर्षांपासून जीर्ण होत असल्यापासूनच संबंधित नगरसेवकांना याबाबत वारंवार माहिती देण्यात आलेली आहे.अशी माहिती श्रीकांत भुसारी यांनी दिली आहे.

Protected Content