Home राजकीय नारायण राणे हे तर भाजपचे बकरे ! : गुलाबराव पाटील

नारायण राणे हे तर भाजपचे बकरे ! : गुलाबराव पाटील

0
71
gulabrav patil

मुंबई प्रतिनिधी । नारायण राणे आम्हाला काय शिकवणार ? ते तर भाजपचे बकरे आहेत अशा शब्दात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुुलाबराव पाटील यांनी आज टिकास्त्र सोडले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने हिंदुत्व सोडले नसल्याचे संकेत देण्यासाठी हा अयोध्या दौरा का, असा प्रश्‍न यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, हिंदुत्वाचा ठेका कोणी घेतला ? शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं आहे. नारायण राणे म्हणाले होते, गणपती बुडण्याआधी शिवसेनेला बुडवीन. सरकार अकरा दिवसही नाही टीकणार. परंतु, नारायण राणे आम्हाला काय शिकवणार ? तेच भाजपचे बकरे बनल्याची टीका त्यांनी केली. तसेच महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound