जळगाव, प्रतिनिधी| माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतलेले नाना पाटील यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर सोसायटी मतदार संघातून अर्ज दाखल केला. त्यांच्या विरुद्ध नाना पाटील यांनी अर्ज केला. परंतु नाना पाटील यांच्या अर्जामध्ये तृटी आढळून आल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी ते रद्द केले. त्यावर नाना पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. मात्र विभागीय आयुक्तांने ते रद्द केले. शेवटी नाना पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.
यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसची १ जागा निश्चित झाली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, संजय पवार, शिवसेनेचे चिमणराव पाटील व अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. मात्र नाना पाटील यांची याचिका उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.