नाना पटोले राज्यपालांकडे सरकार बरखास्तीची करणार मागणी

मुंबई -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  वृत्तसेवा  | शिंदे फडणवीस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या, प्रकल्प बाहेर जात आहेत या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आपण भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी  करणार असल्याची माहिती  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

 

विरोधक शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. राज्यात इडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. प्रकल्प बाहेर जात आहेत, बेरोजगारी वाढली आहे, याबाबत  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे मात्र सरकारकडून कोणतेही ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मागणीसाठी राज्यपालांना भेटणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं.

 

Protected Content