नाथाभाऊ यांच्या दूरदृष्टीतुन साकारलेल्या कर्की -रामगढ तलावाने शेती परिसर समृद्ध

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या अडतिसाव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील रामगढ-कर्की येथील ग्रामस्थां सोबत आज रोहिणीताईंनी संवाद साधला.

 

 

महाराष्ट्र -मध्यप्रदेशच्या सिमा रेषेवर कर्की फाट्यापासून अवघ्या चार कि. मी अंतरावर डोंगराच्या कुशीत आदिवासी समाज बांधवाची  रामगढ वस्ती आहे. या वस्तीपासून जवळच राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या दूरदृष्टीमुळे नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन रामगढ तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरण लाभल्याने भविष्यात हे चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते. जन संवाद यात्रेच्या निमित्ताने रोहिणीताईंनी या तलावला भेट दिली. प्रसंगी या तलावामुळे कर्की परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. केळी उत्पादनामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली आहे. असे सांगून रामगढ येथील आदिवासी बांधवाना रहिवासी जागेपासून वीज, रस्त्याची सुविधा नाथाभाऊनी करून दिल्याने हा आदिवासी बांधव सुखावला असल्याचे प्रतिपादन रोहिणीताई खडसे यांनी रामगढ -कर्की येथील सभेत केले. यावेळी नाथाभाऊंनी गेल्या तीस वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात केलेल्या अनेकविध विकास कामांचा उहापोह केला.

याआधी यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे,प्रवक्ता सेलचे जिल्हा संयोजक हभप विशाल महाराज खोले, माफदा राज्यध्यक्ष विनोदभाऊ तराळ यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील, माजी सभापती विलास धायडे, राजेंद्र माळी,  किशोर चौधरी, सुधिर तराळ, रामभाऊ पाटील, भागवत पाटील, प्रकाश पाटील, मेहमूद शेख, सुनिल पाटील, भाऊराव पाटील,विनायक पाटील, विश्वनाथ चौधरी,शकील खान, अतुल पाटील, नंदकिशोर हिरोळे,विकास पाटील, अमोल महाजन, रवींद्र पाटील, सचिन महाले, किशोर पाटील,मोहन कचरे, दिनकर पाटील, संजय चौधरी,निवृत्ती महाजन, बबलू कापसे, विशाल रोटे, वसंत पाटील,दिपक धुंदले, कैलास कोळी,अतुल महाजन, प्रमोद भालेराव

चेतन राजपुत ,सारंग पाटील ,सौरव सपकाळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content