नागरी समस्या तत्काळ न सोडविल्यास आंदोलन – मनसेचा इशारा (व्हिडिओ

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील विविध समस्यांबाबात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात मनसेचे कार्यकर्त्यांनी शहरात असलेल्या समस्यांबाबत रोष व्यक्त करत तातडीने समस्या सोडविण्यात यावे अशी मागणी मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी दिली.

 

निवेदनाचा आशय असा की, वॉटरग्रेस या कंपनीला शहर स्वच्छतेचा कंत्राट देण्यात आले आहे. परंतु, शहरात अस्वच्छता कायम असून स्वच्छता केवळ कागदावरच होत आहे. याबाबत ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. ठेकेदार कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये माती व फारशी टाकून त्यावर कचरा टाकण्यात येतो असा आरोप करण्यात आला आहे. परंतु सत्ताधारी व विरोधक यावर का बोलत नाही. किंवा आयुक्त प्रशासन का ? लक्ष देत नाही. यामध्ये कुणाची मिलीभगत आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील काही मजल्यावर लावण्यात आलेले लहान वृक्षांचे स्टॅण्ड आहे. यामध्ये वृक्षांचे स्टॅण्डमध्ये कुठल्याही प्रकारची स्वच्छता नसते. तसेच जसे महानगरपालिकेच्या इमारतीतमध्ये वृक्ष संगोपनाचा प्रयत्न होत आहे, तसा शहरातही करण्यात यावा. शहरातील प्रत्येक प्रभागात अमृत योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची दुर्देशा झालेली आहे. तसेच खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हेच समजत नाही यावर तुम्हीच काही तरी पर्याय शोधावा व जनतेलाही सांगावे असे आवाहन करण्यात आले आहे. या समस्या लवकरात लवकर न सोडल्यास मनसे स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी आशिष सपकाळे, संदीप महाले, पंकज चौधरी, कुणाल पाटील, योगेश पाटील, प्रफुल कोळी, समाधान पाटील, अक्षय बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1550635378627248

 

Protected Content