रावेर, प्रतिनिधी । ‘कोरोना’हा संसर्गजन्य वायरस असून याचा प्रभाव रोखण्यासाठी नागरीकांनी सुरक्षित राहवे प्रशासनाला सुध्दा मदत करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे. ते रावेर तहसिल कार्यालयात कोरोना वायरस संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी बोलत होते.
प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी यांनी बैठकीत पुढे सांगितले की, लग्न, संमारंभ, विविध कार्यक्रम असतील तर पुढे ढकलावे. तसेच पूणे,मुंबईच्या सेवा बंद असल्याने त्याभागातील लोक आपल्याकडे आल्यास त्यांनी देखिल घरीच राहावे. आपल्याकडे कोरोना’चा एकही रुग्ण आपल्याकडे अजुन आढळून आलेला नाही. परंतु, खबरदारी म्हणून जनता व प्रशासन यांनी सर्तक राहण्याचे अवाहन केले. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत प्रशासनाला काय उपाय-योजना करताचे आहे यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी तहसिलदार उषाराणी देवगुणे, रावेर पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे, सावदा पालिकेचे मुख्यधिकारी सौरभ जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराज पाटील, गट विकास अधिकारी सानिया नाकाडे, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे,सह पोलिस निरीक्षक राहुल वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराज पाटील, तालुका कृषी अधिकारी आर. एस. धनगर, पोलिस उपनिरक्षक योगेश शिंदे, स्वप्निल पाटील,यांच्यासह तालुका भरातील महत्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
प्रांतधिका-यांनी केले अवाहन
यावेळी प्रांतधिकारी श्री. थोरबोले यांनी तालुक्यातील जनतेला अवाहन केले आहे.की, गरज असेल तरच बाहेर पडा. अफवांवर विश्वास ठेवू नका. जनता कर्क्यु यशस्वी करा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. बाहेरुन आलेल्यांनी घरातच थांबा. सर्दी ,गळा, ताप सारखे लक्षणे आढळल्यास आरोग्य तपासणी करण्याचे अवाहन त्यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.