जळगाव, प्रतिनिधी । प्रभाग क्र. ८ मध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला असून या रुग्णच्या रहिवासी असलेला संपूर्ण परिसर सॅनिटीझर ने फवारणी करून सील करण्यात आलेला आहे. त्यांच्याशी संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.
प्रभाग क्र. ८ मध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे. या रुग्णाच्या रहिवासाजवळील सर्व परिसर सील करून सॅनिटीझ करण्यात आला यावेळी नगरसेवक डॉ. .चंद्रशेखर पाटील, गजानन मामा देशमुख, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. विशेषत: जुन्या हायवे निमखेडी रोडने मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी पुढील १४ दिवस जाणे टाळावे असे आवाहन नगरसेवक डॉ. पाटील यांनी केले आहे. कोरोनाला जळगाव शहरातून हद्दपार करण्यासाठी आपणच स्वतःचे आणि परिसरातील नागरिकांचे रक्षक होणे आवश्यक आहे. प्रभागातील सर्व जाती, पंथ, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, रिपाई यांच्यासह इतर राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सार्वजनिक गणेश महामंडळ, बजरंग दल, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित नागरिक,जेष्ठ नागरिक संघ,महिला बचत गट यांनी आपापल्या परिसरात कोरोना योद्धा म्हणून भुमिका बजावणे गरजेचे आहे. प्रभागातील नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन करावे यासाठी आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जळगाव शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी तोंडावर मास्क वापरावा, हॅन्ड सॅनिटीझर वापरावे, आरोग्य सेतू अँप डाउनलोड करावे,घराबाहेर पडू नये,विशेषतः कॅन्टोनमेंट झोन मधील नागरिकांनी घराबाहेर पडूच नये. पुरेसा व संकरित आहार घ्यावा,पुरेशी झोप घ्यावी. जिल्हाधिकारी ,महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या सूचनांचे पालन व सहकार्य करा,असे आवाहन करण्यात येत आहे.