भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील नागरीक कोरोनाचे विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने रुग्णाच्या संख्येत वाढू होत आहे. यासाठी नागरिकांनी घरातच बसण्याचेे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले.
अधिक माहिती अशी की, शहरातील समता नगर,शिंधी कॉलनी,पंचशील नगर, शांती नगर परिसराचा दिड किलोमीटरचा परिसर सील करण्यात आलेला आहे. नागरिक गांभीर्य लक्षात घेत नसल्याने ही वेळ आली आहे.अजूनही वेळ गेलेली नाही यासाठी आमदार संजय सवकारे कडून नागरिकांना घरातच बसण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहे तसेच आव्हाहन केले जात आहे. यानंतरही नागरिकांनी सूचनांचे पालन न केल्यास प्रशासनही एवढ्या मोठ्या परिसरात कुठे-कुठे पोहचणार हे शक्य आहे नागरिकांनी आपली काळजी स्वतः घेतल्यास कोरोनाच्या संख्येत नक्की घट होणार आहे.
शहरात कोरोना रुग्णाची संख्या पाच झाली असून त्यातील दोन रुग्ण मयत झाले आहे.या पाश्वभूमीवर जिल्ह्याधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजेला शासकीय विश्राम गृहात बैठक आयोजित करण्यात आल्यानंतर भुसावळ शहरातील सील करण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली होती. तसेच अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या होत्या. रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्याने शांती नगर परिसर सील करण्यासाठी प्रांत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये शहराला बंद करण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसून सील करण्यात आलेला परीसर सोडून बाकी परिसर सुरू ठेवण्यात आलेला आहे. तसेच शहरात कोरोना रुग्णासाठी केव्हीड केअर सेंटर ६५० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.अशी माहिती पत्रकारांना प्रांतअधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली.