एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे शनिवार दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी श्री संत गजानन महाराज यांची पायीवारीचे आगमन झाली. यानंतर गावातून मिरवणूक आणि भजन सेवा करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, एरंडोल ते शेगाव पायी वारीचे नियोजन बंडू कोल्हापूरी यांच्यावतीने नियोजन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे पालखी दाखल झाली. यावेळी गावातून पालखीची मिरवणूक आणि भजन सेवा करण्यात आली. याप्रसंगी गावातील सरपंच किशार महाजन, उपसरपंच अशोक पाटील, संजय पाटील, विजय पाटील, हिम्मत पाटील, बापू महाजन, सुरेश पाटील, सुभाष महाजन, योगेश कोळी, रविंद्र कोळी यांच्यासह गावातील भक्तगण आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.