भुसावळ, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ यांच्या निर्देशाप्रमाणे दिनांक ५ मार्च २०२१ रोजी भुसावळ शहरातील नाईट कर्फ्युचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
अधिक माहिती अशी की,भुसावळ शहरात रात्री दहा ते पहाटे तीनवाजेपर्यंत नाईट कर्फयु जारी करण्यात आला आहे. यानुसार नाकाबंदी करण्यात आली होती. यात नाईट कर्फ्युचे उल्लंघन करणाऱ्या दुकानें,व्यक्ती यांचेवर कारवाई करण्यात आली. त्यानुषंगाने आत्तापर्यंत मोटार वाहन कायद्यानुसार ४० वाहनांवर कारवाई करण्यात आली.️ त्याशिवाय बिना मास्कच्या २५ केसेस करण्यात आल्या. त्यामध्ये प्रत्येकाकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे रात्री दहानंतर चालू असणाऱ्या आस्थापनांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे यात ६ दुकाने, हॉटेल्स यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन हद्दीतील १० आस्थापनांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ नुसार कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलिस अधिकारी, भुसावळ यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, शहर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.एच. गायकवाड यांच्यासह वाहतूक शाखा भुसावळ, बाजारपेठ पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे भुसावळ शहर पोलिस स्टेशन व भुसावळ शहर वाहतूक शाखा यांच्या स्टाफने केलेली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/240081487818790