नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आट्या पाट्या फेडरेशन ऑफ इंडिया व तामिळनाडू असोसिएशनच्या वतीने चेन्नई येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या 36 व्या पुरुष वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून नांदुरा येथील ऋषिकेश ज्ञानदेव अंबुस्कर सहभागी झाला होता.
त्याच्या संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत रोप्य पदक प्राप्त केले .याआधी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या सिनियर राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत ऋषिकेशने महाराष्ट्राच्या संघात काम मिळवले होते. चेन्नई येथील राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दमदार कामगिरी करीत पदुचेरी व तामिळनाडू संघाला पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती .ऋषिकेशच्या या कामगिरीबद्दल आट्या पाट्या संघटनेचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, भारतीय महासंघाचे महासचिव डॉ दीप कवीश्वर, महाराष्ट्र आट्यापाट्या महामंडळाचे महासचिव डॉ अमरकांत चिंचोले ,संघटनेचे सीईओ जय कवीश्वर तसेच नांदुरा येथील अभिनव कला सांस्कृतिक बहुउद्देशीय मंच चे सर्व पदाधिकारी यांनी ऋषिकेशच्या या चमकदार कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे .