जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील कादरी नगरात काहीही कारण नसतांना दुकानावर बसलेल्या बाप लेकाला गावातील चार जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चार जणांविरूध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सैफुद्दीन गायासुद्दिन शेख (वय-६४) रा. कादरी नगर, नशिराबाद ता.जि.जळगाव यंचे घरासमोर त्यांचा मुलगा नजर मोहम्मद सैफुद्दीन शेख यांचे कुलर विक्रीचे दुकान आहे. मंगळवार २ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुकानावर मुलगा बसलेला असतांना गल्लीतील शेख अक्रम शेख रूस्तम, शेख वसीम शेख रूस्तम, शेख बस्म्मिील्ल शेख रूस्तम, रूस्तम मिस्तरी सर्व रा. कादरी नगर नशिराबाद यांनी काहीही कारण नसतांना दुकानावर लाठ्याकाठ्या घेवून मुलगा नजर याला मारहाण करण्यास सुरूवात केली. यात नजरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसचे सैफुद्दिन शेख यांना देखील मारहाण केली आहे. याप्रकरणी सैफुद्दिन शेख यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन एकनाथ चौधरी करीत आहे.