जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील मजूराच्या ५ बकऱ्या संशयित दोन जणांना चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, वशीउल्ला मोहम्मद रईस (वय-४२) रा. नशिराबाद ता. जळगाव हे मजूरीचे काम करतात. त्यांच्याकडे ५ ते ६ बकऱ्या आहेत. दररोज ते बकऱ्या शहरात चारण्यासाठी सकाळी १० वाजता सोडतात आणि १२ वाजता सर्व बकऱ्या पुन्हा घरी परतात. नेहमीप्रमाणे ३० नोव्हेंबररोजी त्यांनी सकाळी १० वाजता बकऱ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. मात्र रात्री उशीरापर्यंत त्या बकऱ्या घरी परतल्या नाहीत, त्यांनी शोधाशोध सुरू केली मात्र कुठेच बकऱ्या आढळून आल्या नाहीत. वशीउल्ला रईस यांनी २ नोव्हेंबर रोजी रात्री शहर पोलीस ठाणे गाठून दोन संशयित आरोपी सागर अशोक भोई आणि अशोक छगन भोई रा. भाईवाडा, नशिराबाद यांच्याविरूध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीसात दोन्ही संशयित आरोपीविराधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख हे करीत आहे.