जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग हे मृत्यूचा सापळा बनलेले आहेत. या संदर्भात आधी दिलेल्या निवेदनांवर काहीही कारवाई न केल्यामुळे नशिराबाद येथील नागरिकांनी महामार्ग प्राधीकरण अर्थात ‘नही’चे प्रतिकात्मक उत्तरक्रिया करून निषेध व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून यामुळे अनेक निरपराध नागरिकांचे जीव गेलेले आहेत. या अनुषंगाने नशिराबाद येथील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी हे खड्डे बुजवण्यात यावे यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. तथापि, याला संबंधीतांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे दिनांक २८ जानेवारी रोजी नशिराबादकरांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण अर्थात नहीच्या अधिकार्यांना बोळवण भेट दिली होती. याच वेळी दिनांक ६ फेब्रुवारी रोजी महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिकात्मक उत्तरकार्य करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्तरकार्य करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, उपसरपंच किर्तीकांत चौबे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच पंकज महाजन यांनी सर्व विधी पार पाडून मुंडण केले. यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. या उपोषणाला भेट देऊन माजी मंत्री गुलाबराव देवकर, सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख, शिवसेनेचे माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे यांनी आपला पाठींबा दर्शविला.
खालील व्हिडीओत पहा उत्तरकार्याचा विधी.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2733769180064010