मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नव्या भगव्या झेंड्यावर मनसेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारातील राजमुद्रेची प्रतिमा वापरली आहे. यावर काही संघटनांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मनसेना लिखित स्वरुपात ही नोटीस पाठवली असून यामध्ये त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीवरुन पक्षावर कारवाई का करु नये? याबाबत विचारले आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाने याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. मनसेने आपल्या नव्या झेंड्यावर छापलेली स्वराज्याच्या राजमुद्रेची प्रतिमा त्वरीत हटवावी अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच जर मनसेने ही राजमुद्रेची प्रतिमा हटवली नाही तर संभाजी ब्रिगेड मनसेविरोधात आपल्या स्टाईलनं रस्त्यावर उतरेल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला होता.