पत्रकारांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद (व्हिडीओ)

236d0bfa 5c3e 4c2c 9f91 49d5c7e2a23d

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित १४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात येथील कांताई सभागृहात आज (दि.९) राज्यभरातील पत्रकारांनी सहभाग घेतला.

 

पहिल्या सत्रात मान्यवरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी जळगाव जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जळगाव महापौर सीमा भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, अतुल परदेशी, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, लोकमत निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी , लोकशाहीचे संपादक राजेश यावलकर यांच्यासह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व पदधिकारी यांची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात मिलिंद कुलकर्णी, राजेश यावलकर, वसंतराव मुंढे, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता असुन पत्रकारिता, पत्रकारांचे संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले. माध्यमांचे बदलते स्वरूप याविषयावर भाष्य करताना मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, डिजीटल माध्यमांमुळे प्रत्येक स्मार्टफोनधारक पत्रकार झाले आहेत. त्यामुळे वास्तव आणि आभास याची आपणास जाणिव झाली पाहीजे. सतत अभ्यास, निरीक्षणातुन समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. वादाचे प्रसंग टाळले पाहीजे. अभ्यास, संयम आणि सर्वसमावेशक होऊन संविधानाच्या चौकटीत राहून कार्य केले पाहीजे. ज्याप्रमाणे वृत्तपत्रांना आचारसंहिता आहे, त्या प्रमाणे इलेक्ट्रॉनिकनिक व सोशल मीडीयावरही नियंत्रण पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राजेश यावलकर यांनी काळानुसार पत्रकारिता बदलत असुन त्यात विश्वासार्हता ही छपाई माध्यमांमध्ये आहे. काळानुसार सोशल मीडियातही विश्वासार्हता येईल, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, असे म्हटले. वसंतराव मुंढे यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न केल्याचे सांगितले. १० हजार सदस्य असलेल्या पत्रकार संघातील सदस्यांना पत्रकार संरक्षण कायदा पारित करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले.

 

Add Comment

Protected Content