चाळीसगाव प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नुकत्याच नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांनी आज भल्या पहाटे समितीला भेट देऊन शेतकरी व व्यापार्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
दोन दिवसांपूर्वी राज्य शासन व पणन महामंडळाच्या वतीने चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली मुख्य प्रशासक म्हणून दिनेश पाटील यांच्यासह १७ जणांची नियुक्ती करण्यात आली. कोविड संसर्गामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून व्यापाऱयांसह शेतकऱ्यांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे ही बाब लक्षात घेता आज पहाटे ६ वाजता नूतन प्रशासकांनी भेट देत सर्वांना अचंबित केले. यावेळी ईश्वरसिंग ठाकरे, संजय चव्हाण, भीमराव खलाणे, स्वप्नील कोतकर आदी उपस्थित होते
मास्क लावा, काळजी घ्या अशा प्रकारच्या सुचना देत विक्रीसाठी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांशी हितगूज केले. योग्य भाव मिळतो का ? काही अडचणी आहेत का? असा संवाद साधत व्यापारी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. सोशल डिस्टनसिंगमध्ये बाजार भरवावा, स्वतंत्र पार्कींग व्यवस्था करावी व स्वच्छतेच्या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा अशा स्वरुपाची मागणी यावेळी उपस्थितांच्या वतीने करण्यात आली