नवकार प्रतिष्ठानतर्फे ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील नवकार ढोल प्रतिष्ठानतर्फे महावीर जन्मकल्याणक महोत्सवनिमित्त ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात झाली आहे. दररोज ९० आबालवृद्ध प्रशिक्षणात सहभागी होत असून शिवगंध ढोल पथकाकडून प्रशिक्षण दिले जात आहे.

 

महावीर जयंतीनिमित्त ४ एप्रिल रोजी महावीर जन्मकल्याणक महोत्सव आयोजित आहे. त्यानिमित्त नवकार ढोल प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे ढोल पथकाचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद ठोले, स्वरूप लुंकड, दिनेश बाफना यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रिकेश गांधी यांच्या नियोजनाखाली खान्देश सेंट्रल प्रांगणात हे प्रशिक्षण संध्याकाळी सुरु झाले आहे.

 

प्रशिक्षणात लहान मुलांपासून सर्व वयोगटाचे नागरिक सहभाग घेत आहे.यात झांझ पथक आणि लेझीम पथकाचेही प्रशिक्षण दिले जात आहे. सकल जैन संघाचेही सहकार्य लाभत आहे. ढोल पथकाचे नियोजन आयुष गांधी, सिद्धार्थ डाकलिया, संकेत डाकलिया, दीपक निबजिया हे करीत आहे.

Protected Content