धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने एका अनोखळी तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत्या रेल्वेतून खाली पडलेल्या एका अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ७ मे रोजी दुपारी घडली. दरम्यान, रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात मृतदेह दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटवावी असे आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी केले आहे.

Protected Content