जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली रेल्वे स्टेशनजवळ एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली रेल्वे स्थानक जवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२८ जवळ एका धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी अंदाजे ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनांसाठी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. मायताची कोणतीही ओळख पटलेली नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलीयार खान हे करीत आहे.