पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कजगाव रेल्वेस्थानकानजीक धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, कजगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३४६ / ११ / १३ दरम्यान डाऊन लाईनवर कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रास मिळाल्यानंतर पोलिस हवालदार मधुसूदन भावसार व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवून मधुसूदन भावसार यांनी घटनास्थळा सविस्तर पंचनामा केला असता मयताचे अंदाजे वय ४० वर्ष असुन मयताजवळ कोणताही ओळखीचा पुरावा मिळुन आलेला नसुन मयताचा रंग सावळा, उंची ५ फुट २ इंच डोक्याचे केस बारीक, अंगात पांढरा फुल बाहीचा शर्ट, निळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेल्या अवस्थेत मिळुन आली आहे. घटने प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास चाळीसगाव लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मधुसूदन भावसार हे करीत आहे. मयता विषयी कोणासही काही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात संपर्क साधावा असे आवाहन तपासी पोलिस हवालदार मधुसूदन भावसार यांनी केले आहे.