मुंबई (वृत्तसंस्था) जागतिक आरोग्य संघटने डब्ल्यूएचओने मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्याच्या पॅटर्नचे कौतुक केले आहे.
जागितक आरोग्य संघटनेनं एका ट्विटच्या माध्यमातून जगभरात करोनाविरोधात राबवण्यात येत असलेल्या आक्रमक उपाययोजनांचं कौतुक केलं आहे. न्यूझीलंड, व्हिएतनाम, इटली, स्पेन, कोलंबिया, थायलंड या देशांतील करोना लढ्याचा उल्लेख करताना ‘हू’ ने धारावीचाही गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ‘मुंबईतील एक अत्यंत दाटीचा परिसर असलेल्या धारावीत प्रशासनानं अत्यंत नियोजनबद्ध काम केलं. लोकसहभागाचं एक उत्तम उदाहरण घालून दिल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचचे महासंचालक म्हणाले की, ‘जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. यापैकी काही उदाहरणे इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात.