धामणगाव बढे प्रतिनिधी । येथील जवळच असलेल्या रोहिणखेड गावातील रहिवासी शेख अम्मार शेख मोनीस कुरेशी व धामणगाव बढे वार्ड क्र.२ मधील सालीया बानो फिरोज खान या दोन चिमुकल्यांनी केवळ सात वर्षाचा वयात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवला.
मुस्लिम समाजातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक आस्था आणि पवित्र असा मानला जाणारा रमजान महिना आहे. या वर्षी रखरखत्या उन्हाळ्याच्या सुरवातीलाच अत्यंत उष्णता व तापमानाचे दाहकता जाणवत असून त्यातच कोविड १९ सारख्या आजाराचे थैमान पसरले असतांना देखील ह्या चिमुकल्यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवण्याच्या निर्धार करत तो पुर्णत्वास नेला. मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर, रोजदार (उपवास करणारी व्यक्ती )दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवत असते. या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रास होतो त्यात या सात वर्षांच्या चिमुकल्यांनी पहिला रोजा ठेवून आपल्या धार्मिक आस्था व परंपरेतिल आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला. त्यामुळे या छोट्याशा शेख अम्मार व सालीया बानो यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचे पुष्पगुच्छ व पुष्पहार देवुन सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यामुळे यांना बघून इतर लहान मुलांनाही रोजा (उपवास )ठेवण्याची जिद्द व प्रेरणा मिळाली असुन त्यांचे अल्पवयातील धार्मिक आस्था व पवित्र रमजान महीन्यातील अवतरीत झालेले कुरआंन विषयी असलेली ओढ त्यांच्या हर्षोउल्हासातुन दिसुन येत आहे. त्यांचे उन्हाळ्यातील उष्णतेच्या दाहकतेतही संपूर्ण दिवसभर कडक व कठीण असलेले अन्न पाण्याचे वर्ज्य करुन रोजा ठेवणे काही तरुणांसह वयस्कांनाही अग्नीपरीक्षा समान असून या लहान चिमुकल्यांनी हे कठीण व्रत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.