जळगाव प्रतिनिधी । गर्दी करू नका असे सांगितल्याचे वाईट वाटल्याने तरुणाला कपाशी उपटण्याच्या चिमट्याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजता धानवड गावात घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पित्यासह दोघा मुलांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल धनराज राठोड (वय-२५) रा. धानवड ता.जि.जळगाव हा मंगळवार १२ रोजी रात्री ९ वाजता गावातीलच संजु मावशीच्या दुकानावर गेला. या ठिकाणी उभ्या असलेल्या लोकांना त्याने गर्दी करू नका सांगितले . भगवान चत्रू राठोड यास राहुलच्या बोलण्याचा रागाला त्याने शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. राहुलला वाचविण्यासाठी दिनेश व निलेश असे दोघं भावंड आले असता त्यांनाही भगवान राठोड यांच्या धोंडू राठोड व सनी राठोड या मुलांनी मारहाण केली. या वादातून भगवान राठोड याने त्याच्या घरी जाऊन कपाशी उपटण्याचा लाकडी चिमटा आणला व राहुलच्या पाठीवर तसे डोक्यावर मारहाण केली . राहुल ला वाचवण्या झालेल्या नीलेश व राहुल आई सुशीलाबाई यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
उपचारानंतर पोलिसांत दिली तक्रार
जखमी राहुलला गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याने बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून भगवान चत्रु राठोड, धोंडू भगवान राठोड व सनी भगवान राठोड या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खैरनार करीत आहेत.