खळबळजनक : धरणगावातील संशयिताच्या संपर्कातील ११ जण क्वारंटाईन ; परिसरही केला सील

 

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील खत्री गल्ली परिसरातील एका संशयिताच्या संपर्कातील ११ जणांना खबरदारीचा उपाय म्हणून कोविड १९ विशेष कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, संशयित राहत असलेला परिसरही सील करण्यात आला असून  संशयिताचा अहवाल आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

शहरातील खत्री गल्ली परिसरातील एका संशयिताला काही दिवसापासून निमोनियाची लक्षणं होती. परंतू प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत, हायरिक्स संपर्कात आलेल्या ११ जणांना खबरदारीचा उपाय म्हणून धरणगाव महाविद्यालयातील कोविड १९ विशेष कक्षात क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दिली. ११ जणांमध्ये ९ सदस्य परिवारातील तर अन्य २ जण आहेत. या संशियातला अमळनेर प्रवासाची हिस्ट्री असल्याची माहिती देखील समोर येत आहे. परंतू याबाबत प्रशासनाने अधिकृत माहिती दिलेली नाही. पालिकासह महसूल प्रशासनाने उपाय योजना सुरु केल्या असून धरणगाव नगरपालिकेने संबंधित परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. तर संबंधित परिसर सील केल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली आहे. त्यामुळे अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत, धरणगावकरांची आता धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित परिसरातील नगरसेवकांची एक विशेष मिटिंग बोलवली असल्याचे देखील कळते.

Protected Content