सावदा,ता. रावेर, प्रतिनिधी । लोहारा येथील लहान धरण भरून वाहू लागले आहे. मध्य प्रदेश परिसरात उत्तम पाऊस झाल्याने काल पाल येथील गारबर्डी सुकी नदीवरील धरण भरून वाहू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
लाहोरा परिसरातील गावांमधील शेतीला सुकी नदीवरील धरणाचा नेहमीच फायदा होत असतो. सुकी नदीच्या पात्रात पाणी आल्याने, कुंभारखेडा येथील शेतकऱ्यांनी सुकी नदी मातेचे दर्शन घेत पूजा करत नारळ अर्पण केले. यावेळी सुकी तेरा ही सहारा असा जय घोष केला. याप्रसंगी ललित चौधरी, महेंद्र महाजन, चंद्रकांत पाटील, दुर्गेश महाजन, विलास ताठे आदी उपस्थित होते. सुकी नदी वाहू लागल्याने परिसरात पाण्याची पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे. विहीरी, कुपनलिका यांना खूप मोठ्या फायदा होवून आज उन्हाळ्याची चिंता परिसरातील शेतकरी वर्गाची कमी होण्यास मदत मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2180172598795657/