धरणगाव (प्रतिनिधी) आज सकाळी आलेल्या अहवालानुसार शहरात पुन्हा ४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव टिळक तलाव आणि परिहार चौकातील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
आज सकाळी आलेल्या रिपोर्टनुसार धरणगाव शहरात पुन्हा ४ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील टिळक तलाव आणि परिहार चौकातील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात फवारणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या १८३ इतकी झाली आहे. यातील १६ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला ५७ रुग्ण उपचार घेत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.