धरणगाव प्रतिनिधी । दुपारी घरात झोपलेले असतांना जिर्ण झालेली भिंत अंगावर पडून एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, मनोहर प्रल्हाद पाटील (वय-४८) रा. मराठे गल्ली, बालाजी मंदीर रोड धरणगाव यांच्या घराच्या बाजूला इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. काम सुरू असतांना त्यांच्या घराच्या भिंतीला तडा गेला होता. दरम्यान आज कलम ११४ लागू असल्याने मनोहर पाटील घरी एकटेच होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास ते घरात झोपले असतांना जिर्ण झालेली भिंत पडली. यात त्यांचा दबून मृत्यू झाला. त्यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील असा परीवार आहे.