धरणगाव महाविद्यालयात स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा उत्साहात

dharangaon

धरणगाव, प्रतिनिधी | येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अॅड. दिलीप बोरसे उपस्थित होते.

बक्षीस वितरण सोहळ्यात अॅड. दिलीप बोरसे यांनी सांगितले की, जीवनात सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तेबरोबर कलेलाही महत्त्व दिले पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रमच्या माध्यमातून संस्कार जोपासले जातात असे उदगार काढले. डॉ अजय शास्त्री यांनी सांगितले की, महापुरुषांचे विचार,आचार अंगीकार केल्यास जीवन समृद्ध होते. तसेच प्रमुख अतिथी डॉ. गीतांजली ठाकूर यांनी सांगितले की, स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांना सुप्त कला गुणांना व्यक्त करण्यासाठी मोठे हक्काचे व्यासपीठ असते. कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी होते. तर प्रमुख पाहुणे डॉ.मिलींद डहाळे, संचालिका निना पाटील, प्राचार्य डॉ. टी. एस.बिराजदार, पी. आर. हायस्कुल मुख्याध्यापक प्रा.बी. एन. चौधरी, उपप्राचार्य डॉ. के. एम. पाटील, उपप्राचार्य प्रा. आर. आर. पाटील,परवेक्षक प्रा. बी. एल. खोंडे, भगवान महाजन सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. टी. एस.बिराजदार यांनी केले. संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, भगवान महाजन यांनी विध्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मगण बन्सी, विनोद रोकडे , स्नेहसंमेलन प्रमुख श्रीमती प्रा.आर.पी.चौधरी, प्रा.सौ.आर.जे.पाटील, डॉ. के. डी. महाजन, डॉ. दीपक पाटील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एन.एस एस.,एन.सी.सी.,स्काऊट गाईड,रोव्हर रेंजर,परीक्षेतील गुणवंताचा, विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान पत्र व स्म्रुतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. के. डी. महाजन यांनी केले तर आभार प्रा.सौ.आर.जे.पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content