जळगाव जिल्हा जागृत जनमंचच्या उपोषणास यश ; बुधवारी ग्रामसभा

WhatsApp Image 2020 02 10 at 18.10.40

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा जागृत जनमंचतर्फे वाघनगरच्या नागरिकांच्या मागणीनुसार गट नंबर १७८/२ मधील ओपन स्पेसमधे साइ छत्र चौकाजवळ ५ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले होते.त्यात ग्रामसभेचे आयोजन बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.तसे पत्र ग्रामसेवक सुर्यवंशी यांनी शिवराम पाटील यांना सुपुर्त केले.

दिनांक ५ फेब्रु. पासून वाघ नगर रस्ते, सफाई, दलित वस्ती सुधार निधीचा गैरवापर , अपूर्ण जलस्वराज्य पाणी पुरवठा योजना , इत्यादी समस्यांसाठी जळगाव जिल्हा जागृत जनमंच तर्फे शिवराम पाटील काकांनी वाघ नगर मध्येच आमरण उपोषनास सुरुवात केली होती व त्यास ग्रामपंचायत स्तरावर यश मिळाले आहे . तरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी शिवराम पाटील यांना ज्यूस पाजून उपोषण सोडले. यावेळेस व्हि.डी.ओ. मोतीराया साहेब, ग्रामसेवक सुर्यवंशी उपस्थित होते. १२ फेब्रुवारीला वाघनगर मधे प्रथमच ग्रामसभा मंजूर केली. ग्रामसभेस जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी उपस्थिती देऊन उपकृत करावे,अशी विनंती गुरूनाथ सैंदाणे व ग्रामस्थांनी केली. यासाठी कांग्रेसचे सरचिटणीस जमील शेख आणि तालुका अध्यक्ष मनोज चौधरी यांनी बीडीओ सोनवणे यांना निवेदन देऊन ग्रामसभेसाठी आग्रह केला. विवेक ठाकरे, अरूणा पाटील, डॉ. सरोज पाटील , प्रदिप साळी यांनी पत्राचार आणि संवाद घडवून आणला.म्हणून उपोषणाला यश आले.

Protected Content