धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात २३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात एकुण २३ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यात साळवा २, मुसळी १, अंजनविहीरे १, वाघळूद बु १, खपाट ४, पिंप्री ५, जांभोरे १, नांदेड ३, भोद १, रोटवद १, खर्द बुद्रुक २, चिंचपूरा १ असे एकूण २३ कोरोनाबाधित रुग्ण आज तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. धरणगाव तालुक्यात एकूण रूग्ण संख्या ८८० झाली असून यापैकी ३५ जणांचा मृत्यू तर ५९२ जण बरे होऊन घरी पाठविले आहे. तर उर्वरित २५३ रुग्ण उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, dharangaon latest news, dharangaon news, dharangaon corona news, dharangaon corona updates