धरणगाव, प्रतिनिधी । “कुळवाडी भूषण” या बिरुदावलीने ज्यांचा गौरव तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला त्या विश्ववंद्य छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरात भव्यदिव्य रॅली व शोभायात्रा काढून राजेंना अभिवादन करण्यात आले.
धरणगाव शहरात ‘शिवजन्मोत्सव – २०२०’ निमित्त रॅली व शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. महाराजांच्या प्रतिमेचे ट्रॅक्टर , बग्गीवर माँसाहेब जिजाऊ व बालशिवराय, ४ घोड्यांवर मावळे , पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा आणि डोक्यावर फेटे अशा रुबाबदार अवतारात २०० ते ३०० महिला भगिनी व मुली , ५० मुलींचे अतिशय देखणं संचलन डोक्यावर फेटे – नऊवारी साड्या असलेलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारं लेझीम – झेंडे आणि ढोल पथक ( शिवकन्या पथक ) , गावातील जेष्ठ नागरिक – पुरुष बांधव व बहुसंख्य युवक , महाराष्ट्र बँड अशा प्रकारे रॅली व शोभायात्रेचे स्वरूप होते.
रॅलीचा मार्ग
बालाजी मंदिर – धरणी चौक – कोट बाजार – शास्त्री मार्केट – श्रीराम मंदिर -परिहार चौक -शिवराय स्मारक – बाबासाहेब स्मारक ते शिवरायांचे स्मारक असे होते. रॅलीच्या दरम्यान क्रांतिसूर्य महात्मा फुले – लालबहादूर शास्त्री – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या सर्व थोर महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लेझीम पथकातील मुलींचा उत्साह, स्वयंसेवकांची शिस्त , सर्व समाज बांधवांचा सहभाग, युवकांचा जोश, रॅलीतील सर्वांची स्वयंशिस्त, गावपरिसर दणाणून सोडणाऱ्या बहुजन महापुरुषांच्या घोषणा , बग्गी – घोडे – बँड इ. नानाविध वैशिष्ट्य असलेल्या रॅलीने धरणगाव करांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ झाला.
माल्यार्पण व पूजन – शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य , लोकनियुक्त नगराध्यक्ष, गटनेते, सर्व नगरसेवक , गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी , गावातील विविध समाजाचे अध्यक्ष व समाज बांधव , जिजाऊ ब्रिगेड, नारीशक्ती ग्रुप, शिवकन्या पथक, धनपा कर्मचारी , पोलीस प्रशासन या सर्वांच्या वतीने महाराजांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती – कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. आमदार स्मिताताई वाघ यांनी सदिच्छा भेट दिली. रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , पंचायत समितीचे सभापती मुकुंदभाऊ नन्नवरे , काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील साहेब , राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे , लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी , माजी नगराध्यक्ष – ज्ञानेश्वर महाजन , पी. एम. पाटील सर , पुष्पाताई महाजन , उषाताई वाघ , अंजलीताई विसावे , भाजपा गटनेते कैलास माळी सर , नगरसेवक – वासुदेव चौधरी , भागवत चौधरी , विनय भावे ( पप्पू भावे ) , अहमद पठाण , शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन , भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रतीलाल चौधरी , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
मोलाचे सहकार्य – शिवरायांच्या स्मारकाचे नुतनीकरण केल्याबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांचे आभार मानण्यात आले. रॅलीत शिस्त राखण्यात पोलीस निरीक्षक पवन देसले व पोलीस स्टेशन धरणगाव चे महिला – पुरुष कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रॅलीच्या मार्गावर साफसफाई – लाईट व्यवस्था करण्यात लोकनियुक्त नगराध्यक्ष व धनपाच्या कर्मचार्यांनी मोलाचे सहकार्य केले. शिवकन्या लेझीम पथकातील सर्व मुली व त्यांचे मार्गदर्शक गटनेते कैलास माळी सरांचे अनमोल सहकार्य लाभले. जिजाऊ ब्रिगेड – नारीशक्ती ग्रुप – गावातील महिला भगिनी यांनी रॅलीची शोभा वाढवली. गावातील पतसंस्था व बँका यांनी ठिकठिकाणी स्वागतगेट उभारले. देवरे आबा – ट्रॅक्टर , कृपा जल यांनी पाणी , मोहन पाटील यांनी जेवण तयार केले. गावातील विविध समाजाचे अध्यक्ष तसेच सर्व समाजबांधव व भगिनी , गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते , गावातील सर्व शिवप्रेमी युवक या सर्वांचे सहकार्य लाभले म्हणून हा देखणा कार्यक्रम साकार झाला. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे शिवजयंती उत्सव समिती , धरणगाव च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.