धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव शहरातील नागरिकांना नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने आज नगरपालिकेवर जनआक्रोश हंडा मोर्चा काढला.
आज सकाळी शहरातील बालाजी मंदिरा पासुन भाजप तर्फे नगरपालिकेवर काढण्यात आला. या मोर्चात महिला,नागरीक अबाल वृद्ध शेकडोच्या संख्येने हंडा व मडक्यासह सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. नगरपालिकेत मोर्चा येताच संतप्त नागरीकांनी नगरपालिकेत मडके फोडून संताप व्यक्त केला.
शेवटी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले गटनेते कैलास माळी यांनी पाणी पुरवठा सुरळीत होत नसेल तर राजीनामे देऊन खुर्च्या खाली करा असे सांगितले.त्यानंतर मधुकर रोकडे,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, भाजप नेते अॅड.संजय महाजन यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. गुलाबराव मराठे यांनी सूत्रसंचालन केले तर अॅड.वसंतराव भोलाणे आभार मानले.
मोर्चात शिरीष बयस, प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, पुनिलाल महाजन,शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक शरद अण्णा कंखरे, ललित येवले, भालचंद्र माळी, संगीता मराठे, शोभा राजपुत, कडू बयस, प्रमिला रोकडे, चंद्रकला भोलाणे, कल्पना महाजन, भास्कर मराठे, सुनिल चौधरी, राजेंद्र महाजन, संजय पाटील, योगेश ठाकरे, सरचिटणीस कन्हैया रायपुरकर, सचिन पाटील, आनंद वाजपेयी, हितेश पटेल, प्रल्हाद पाटील, विजय महाजन, अमोल कासार, जुलाल भोई, संजय कोठारी, किशोर चौधरी, भूषण कंखरे, किशोर माळी, निलेश माळी, डोंगर चौधरी, शरद भोई, एकनाथ पाटील, अनिल महाजन, योगेश महाजन, आनंदा धनगर आदींसह गावातील महिला व नागरिक सहभागी झाले होते.