धरणगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने विविध उपाययोजना

धरणगाव, प्रतिनिधी । शहरातील नवेगाव तेलीतलाव परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शासनाच्या कॉन्टाईनमेंट प्लाननुसार एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी उपाययोजना करण्याबाबत आदेश पारित केले आहे.

प्रशासनातर्फे रुग्णाच्या घराजवळील २५० मीटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात संचारबंदी लागू असल्याने या क्षेत्रात प्रवेशास व निर्गमनास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. या परिसरात जीवनावश्यक वस्तू व घरपपोच वैद्यकीय सेवा देण्यासाठी गल्ली, मोहल्ला, वार्ड निहाय देण्यात येत आहे. या क्षेत्रात चेक पोस्ट एक्झिट पॉइंटवर आरोग्य पथकाद्वारे सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व घरांचे सर्वेक्षण व आरोग्य चाचणी करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहेत.

Protected Content