कोरोना व्हायरस : मृतांचा आकडा १००० पार, ४० हजार बाधित

korena

बीजिंग वृत्तसंस्था । चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा हजारांवर पोहोचला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे चीनमध्ये १०१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४०,००० अधिक लोक कोरोना बाधित आहेत. नेशनल हेल्थ कमीशनने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनामुळे आणखी ९७ लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील ९१ लोक हुबेई येथील होते.

नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, हीलोंगजियांग, जिआंगशी, हैनान आणि गान्सूमधून या ठिकाणांहून एका-एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चीनमधील ३१ राज्यांमध्ये आतापर्यंत एकून ९०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी २९६ रूग्ण कोरोना व्हायरसमुळे आजारी होते. तसेच एकूण ३२८१ लोकांना उपचारानंतर हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आलं आहे. चीनी आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस सेवेरे एक्ट्यू रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स)चं दुसरं रूप आहे. दरम्यान, २००२-२००३ मध्ये हॉन्गकॉन्ग आणि चीनमध्ये या आजारामुळे ६५० लोकांचा मृत्यू झाला होता. याव्यतिरिक्त संपूर्ण जगभरातील १२० लोकांचा मृत्यू झाला होता.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content