धरणगावात एकाच ठिकाणी दोन अपघात ; नगराध्यक्षांनी जखमींना पोहचवले रुग्णालयात

 

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव-जळगाव रस्त्यावरील पाटचारी जवळ एकाच जागेवर आज दुपारी दोन भीषण अपघात झाले. यावेळी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतू या दोन अपघातात तीन जण जखमी झाले. तर या दोघं अपघातातील जखमींना लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

 

 

धरणगाव ते पिंप्रीपर्यंत फोर लेनचे काम सुरु आहे. सध्या कोरोनामुळे काम थांबलेले आहे. आज दुपारी दोन ते ३ वाजेच्या सुमारास धरणगाव-जळगाव रस्त्यावरील पाटचारी जवळ पहिला अपघात दुचाकीचा झाला. दुचाकी क्रमांक एम.एच – १९ ओके ३९२८ वरून राजेंद्र बाबुराव सोनवणे ,चंदाबाई राजेंद्र सोनवणे (रा.भुसावळ) धरणगावला येत होते. पाटचारी जवळ रस्त्यावरील उतार अचानक समोर आल्यानंतर दुचाकी स्लीप झाली. त्यात दोघं पती-पत्नी गंभीर जखमी झाले. महिलेचे डोके फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु होता. सुदैवाने कामानिमित्त लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी याच रस्त्यावरून जात होते. त्यांनी तात्काळ जखमींना आपल्या वाहनात बसून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलेला सिटीस्कॅनसाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. जखमींना रुग्णालयात दाखल करून श्री. चौधरी हे जिनिंगवर जात नाही, तोच पुन्हा त्याच ठिकाणी एक आयशर क्र. एम.एच-२० डी ४९०९ ही गाडी पलटी झाली. या अपघातात चालक मुकेश धोबी हा गंभीर जखमी झाला. यावेळी देखील निलेश चौधरी यांनी तात्काळ जखमी ड्रायव्हरले रुगणालयात दाखल केले. दरम्यान, रस्त्याचे काम लवकर सुरु व्हावे, अशी मागणी नागरिक करताय. तर नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या कार्यतत्परतेमुळे तिघं जखमींना वेळीच मदत मिळाली.

nilesh s chaudhari

 

Protected Content