धरणगावात उद्यापासून पाच दिवसांचा स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यू

धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता धरणगाव शहरात रविवार दिनांक ७ जूनपासून पाच दिवसांचा स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून नागरिकांना याचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन व व्यापारी महामंडळाने केले आहे.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव शहरात रोज दोन-तीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे गावातील सुरक्षितता आपण ठेवावी ह्या हेतूने शुक्रवारी व्यापारी बांधवांची बैठक घेण्यात आली. यात किराणा, कापड दुकान, भाजी-पाला विक्रेते – किरकोळ व लिलाववाले, होजिअरी, कटलरी, भांडे, जनरल स्टोअर्स, हार्ड-वेअर, फळ विक्रेते,मोबाईल शॉपी, सर्व प्रकारचे मांसाहारी विक्रेते, पान टपरी, चहा टपरी, टेलरींग व्यवसाय, हॉटेल, बार, देशी दारु दुकान ,मेडिकल, दुध विक्रेते, इत्यादिंनी दि. ०७ जुन रविवार ते ११ जून २०२० वार गुरुवारएकुण ५ दिवस पर्यंत संपूर्ण धरणगाव शहर बंद ठेवण्यात येणार आहे. असे आज झालेल्या व्यापार्‍यांचा बैठकीत ठरले आहे.

या बैठकीला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड नायब, मुख्यधिकारी जनार्दन पवार, सपोनि पवन देसले यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, विलास महाजन, भानुदास विसावे, पुनिलाल महाजन यांनी जनता कर्फ्यू विषयी आपले विचार मांडले. या बैठकीला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगल भाटीया, उपाध्यक्ष संजय कोठारी, मेडिकल असोसिएशनचे मनिष जैन यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थीत होते.

या बैठकीत जनता कर्फ्यूच्या कालावधीत खते आणि बी-बियाणे सकाळी ८ ते २, दुध व्यवसाय सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ६ ते ९ उघडे राहतील. मेडिकल बांधवांसाठी धरणी चौक, कोट बाजार व शिवाजी पुतळा या ठिकाणी दोन- दोन दुकाने आलटून पालटून सकाळी ९ ते २ या कालावधीत उघडे राहतील असे ठरले. जनता कर्फ्यू संपल्या नंतर म्हणजेच शुक्रवारपासून दररोज सर्व दुकाने सकाळी ९ ते २ या वेळेत उघडी राहतील. तसेच, जोपर्यंत कोरोना ची परिस्थितीमधे सुधारणा होत नाही, तोपर्यंत गुरुवार हा संपूर्ण दिवस बंद राहील असे निर्णय घेण्यात आले. याला सर्व व्यापारी बांधवांनी संमती दर्शवून एक समिती गठित करण्यात आली. त्या समिती मध्ये सर्व स्तरावरील व्यापार्‍यांचे दोन दोन प्रतिनिधी घेण्यात आले. वरील कालावधीत समिती व उपस्थित नागरिक लक्ष ठेवून राहतील तसेच हि समिती प्रत्यक्ष गावात फिरणार आहे. तरी वरील सर्व नियम आपले नातेवाईक, मित्र परिवार, समाज बांधव, आणि आपण स्वत: च्या सुरक्षा साठी वरील निर्णय घेण्यात आला असुन, सर्व व्यापारी बांधव व नागरीक यांनी जनता कर्फ्यू ला साथ द्यावी आणि
सर्व नागरिकांनी कोणताही वाद न घालता स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याकरिता सोशल कर्फ्यू पाळावा असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

Protected Content