धरणगाव (प्रतिनिधी) शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील हॉटेल बाबलामध्ये चढ्या दराने मद्यविक्री होत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. विशेष म्हणजे एका ग्राहकानेच याबाबत स्टिंग ऑपरेशन करून कशा पद्धतीने ग्राहकांचा खिसा कापला जात आहे. विशेष म्हणजे ना मास्क, ना निर्जंतुकिकरण आणि ना परवाना बघता दारू कशी विक्री केली जात असल्याचेही या स्टिंगमधून उघड झाले आहे.
राज्य सरकारने अटी-शर्तींच्या अधीन राहून मद्य विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातही मद्य विक्रीला परवानगी दिली होती. त्यानुसार लॉकडाऊनचे सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. हॉटेलात बसून कुणालाही मद्य प्राशन करता येणार नसल्यामुळे ग्राहकाला संबंधीत मद्याच्या छापील मूल्यात म्हणजेच एमआरपीमध्येच विक्री करावी लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. परंतू धरणगावातील हॉटेल बाबलामध्ये चढ्या दराने मद्यविक्री होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका ग्राहकाने केलेल्या स्टिंगनुसार हॉटेल चालक ग्राहकाला १९० रुपये किंमत असलेली मॅजिक मुमेंट व्होडका चक्क २४० रुपयाला देत आहे. या व्हिडीओमध्ये ग्राहक त्याला भाव कमी करण्याचे सांगत आहे. परंतू हॉटेल चालक स्पष्ट नकार देतो. दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी नियमांचे उल्लंघन दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करून अनेकांचे परवाने रद्द केलेले असतानाही चढ्या दरात मद्य विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मद्याच्या छापील मूल्यात म्हणजेच एमआरपीमध्येच विक्री करावी लागणार असल्याचे उत्पादन शुल्काचे निरीक्षक एम.बी.दहीवडे यांनी स्पष्ट केले आहे.
ना मास्क..ना निर्जंतुकिकरण आणि ना मागितला परवाना !
शासनाच्या आदेशानुसार मद्य विक्री करणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून ते वैद्यकीयदृष्ट्या पूर्ण पात्र ठरले, तरच त्यांना ओळखपत्र देण्यात येणार होते. तसेच दारू देणाऱ्या, घेणाऱ्या व्यक्तींनी मास्क वापरावा. वेळोवेळी हाताचे निर्जंतुकिकरण करावे. हे नियम पाळले जातील, याची दक्षता दारू विक्रेत्याने घ्यायची होती. एवढेच नव्हे तर दारू पिण्याचा परवाना असलेल्या परवानाधारक व्यक्तीलाच दारू विक्री करण्याचेही सांगण्यात आले होते. परंतू धरणगावच्या या व्हिडीओमध्ये हॉटेल चालक कोणतेही नियम पाळत नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. दरम्यान, तसेच दुकानातील स्टॉक संपल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यास अहवाल सादर करून दुकान बंद करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
https://www.facebook.com/watch/?v=1660972380725761