धरणगाव प्रतिनिधी ।शहरातील होमिओपॅथी डॉक्टरांनी तहसीलदारासह वैद्यकिय अधिकारी यांची आज भेट घेतली. धरणगाव तालुक्यातील कोरोनाबाधित व संशयित रूग्णांसाठी होमिओपॅथी औषधे उपलब्ध करण्यात आले असून भविष्यात गरज भासल्यास होमिओपॅथी डॉक्टर तत्पर असतील असे आश्वासन यावेळी उपस्थित डॉक्टरांनी दिले.
गेल्या आठवड्यापासून कोरोनाने एंट्री केली आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शासन अनेक उपाययोजना करत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील होमिओपॅथी डॉक्टरांनी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय सोनवणे यांची भेट घेतली. शहरातील कोरोनाबांधित व संशयित रुग्णांना होमिओपॅथीची औषधे सुरू करण्यात आली असून भविष्यात औषधांची गरजेनुसार करोनाग्रस्त रुग्णांना होमिओपॅथीची औषध देण्यास शहरातील सर्व होमिओपॅथी डॉक्टर हे तत्पर राहतील असे आश्वासन बैठकीत होमिओपॅथी डॉक्टरांनी दिले. सोबत ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही हे होमिओपॅथी औषध उपलब्ध करून देण्यात आले आहे. बैठकीला डॉ.अक्षय भावे, डॉ. पंकज अमृतकर, डॉ.पुष्कर महाजन, मंदार चौधरी उपस्थित होते.
तहसीलदारांचीही घेतली भेट
आज धरणगाव येथे तहसीलदार नितिन देवरे यांची देखील होमिओपॅथी डॉक्टरांनी भेट घेवून चर्चा केली. महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी औषधी उपलब्ध करून दिल्या आहे.